Advertisement

"ऑफिसमध्ये येऊन मारू", हितेंद्र ठाकूरांचा पालिका अधिकारी, आयुक्तांना इशारा

पाणीप्रश्नाबाबत पालिका अधिकारी व आयुक्तांवर हितेंद्र ठाकूर यांनी इशारा दिला आहे.

"ऑफिसमध्ये येऊन मारू", हितेंद्र ठाकूरांचा पालिका अधिकारी, आयुक्तांना इशारा
SHARES

स्वातंत्र्य दिनानिमित्त विरारमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार हितेंद्र ठाकूर पालिका अधिकारी आणि आयुक्तांना दमदाटी करताना दिसले.

भारताचा स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिनी अनेक ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात आले. स्वातंत्र्यदिनी विरार महानगरपालिका हद्दीत ध्वजारोहणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या दिनानिमित्त विरारमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार हितेंद्र ठाकूर पालिका अधिकारी आणि आयुक्तांवर नाराजी व्यक्त करताना दिसले.

विरारमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर भरलेल्या जनता दरबारात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालिका अधिकारी आणि आयुक्तांना फटकारले. जनता दरबारात अनेक नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना जाब विचारला.

अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने आमदार हितेंद्र ठाकूर यांनी थेट महापालिका आयुक्तांवर ताशेरे ओढले. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे इतर अधिकाऱ्यांऐवजी आयुक्तांनीच द्यावीत, यावर त्यांनी भर दिला.



हेही वाचा

मुंबईत भाजपकडून भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

नवाब मलिक यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा