Advertisement

मुंबईत भाजपकडून भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघाला 3.51 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे

मुंबईत भाजपकडून भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन
SHARES

भारतीय जनता पार्टीकडून आगामी पालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काही नवीन आणि वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.

असं म्हटलं जातं की, येणाऱ्या निवडणूकांसाठी भाजपकडुन जनतेपर्यंत पोहचण्यासाठी नवीन उपक्रम 'नमो' आणि 'डीएफ' स्पर्धेच आयोजन करण्यात आलं असून महिलांसाठी आता खास मंगळागौर स्पर्धा आयोजित केली गेली आहे.

१६ ऑगस्ट पर्यंत या स्पर्धेची नोंदणी करता येणार आहे. या मंगळागौर स्पर्धेमध्ये पहिले पारितोषिक ३ लाख ५१ हजार, तर दुसरं पारितोषिक २ लाख ११ हजार एवढे असणार आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये या विषयावर माहिती दिली होती. ते म्हणाले की, "भाजप हे मोठ्या प्रमाणात महिलांसाठी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करत आहे. महिलांना स्वतःसाठी कायम वेळ काढण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यातून आता त्यांना थोडासा दिलासा आणि आपली परंपरा जपण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये हा कार्यक्रम करुन भाजप आता माता भगिणींशी संवाद साधून नात घट्ट करुन परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहे." असं शेलार म्हणाले आहे.

भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, "महिलांचे जीवन हे खूप दगदगीचे असते. भाजपच्या वतीने महिलांना आता एक नवीन प्लॅटफॉर्म मिळणार आहे. मी आशिष शेलार यांचे आभार मानेल की त्यांनी हा उपक्रम जाहीर केला. मुंबई प्रमाणे आपण महाराष्ट्रात देखील ही स्पर्धा भविष्यात करु. त्यामध्ये जास्तीत जास्त महिला सहभाग घेतील", असा विश्वास चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केला.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा