Advertisement

मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी आमदार इम्तियाज जलिल न्यायालयात

जलिल यांनी अॅड.सतिश तळेकर यांच्या माध्यमातून नुकतीच ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर २३ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना, मुस्लिम आरक्षणाला डावललं जात असल्याचाही जलिल यांचा आरोप असून मुस्लिम समाजालाही त्वरीत आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी आमदार इम्तियाज जलिल न्यायालयात
SHARES

राज्य सरकारकडून मराठा समाजाला देण्यात आलेलं १६ टक्के आरक्षण घटनाबाह्य असल्याचं म्हणत याआधीच अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळं अडचणीत आलेल्या मराठा आरक्षणाच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. कारण मराठा आरक्षण रद्द करण्याच्या मागणीची दुसरी एक याचिका आता उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ही याचिका दाखल केली आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी मराठा आरक्षणाला त्वरीत स्थगिती द्यावी आणि मराठा आरक्षण रद्द करावं, अशी मागणी या याचिकेद्वारे त्यांनी केली आहे.


मुस्लिम अारक्षणाची मागणी

जलिल यांनी अॅड.सतिश तळेकर यांच्या माध्यमातून नुकतीच ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर २३ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना, मुस्लिम आरक्षणाला डावललं जात असल्याचाही जलिल यांचा आरोप असून मुस्लिम समाजालाही त्वरीत आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्याचवेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरही जलिल यांनी आक्षेप घेतला आहे. 


अहवालही रद्द करा

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालालाही आव्हान देत हा अहवालही रद्द करावी अशी मागणी जलिल यांनी याचिकेमार्फत केली आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याची मागणी करणारी ही दुसरी याचिका असल्यानं आता नक्कीच राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा