अखेर पाण्याचा प्रश्न सुटला

 BDD Chawl
अखेर पाण्याचा प्रश्न सुटला
अखेर पाण्याचा प्रश्न सुटला
See all

वरळी - बीडीडी चाळ क्र. ३२, ना. म. जोशी मार्ग येथील दुसऱ्या मजल्यावरील नागरिकांना अपुऱ्या आणि कमी दाबाने पाणीपुरवठा व्हायचा. हा प्रश्न कायमस्वरुपी सुटला आहे. आमदार सुनील शिंदे यांच्या आमदार निधीतून बसवण्यात आलेल्या १०, ००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि अत्याधुनिक पद्धतीचे पंप वापरून तयार करण्यात आलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. लोकांना पाण्यासाठी होणारी वणवण अखेर संपली, त्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Loading Comments