बुधवारी पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले. मुंबईकरांना पावसामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अशातच बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) या अडचणी कमी करण्यात सपशेल अपयशी ठरल.
अनेक ठिकाणी पाणी उपसणारे पंप (water pump) काम करत नव्हते, आपत्कालीन विभागाचे कर्मचारी फोन उचलत नसल्याचा आरोप देखील आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे. याप्रकरणी सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून तक्रारही केली आहे.
मुंबईत बुधवारच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेच्या नियोजनावर टीका होत आहे.
हवामान खात्याने रेड अलर्ट लागू केला असताना महापालिका यंत्रणा सज्ज नसल्याचा आरोप शिवसेनेचे (shiv sena) दिंडोशीतील आमदार सुनील प्रभू (sunil prabhu) यांनी केला आहे.
पालिकेच्या नियंत्रण कक्षाला फोन केला असता कोणीही प्रतिसाद देत नसल्याच्या तक्रारी आल्या. पावसाचे पाणी उपसण्याचे पंपही बंद पडल्याच्या तक्रारी होत्या.
रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ट्रेनमध्ये प्रवासी अडकले होते. अशा आपत्कालीन परिस्थितीमुळे मुंबईकरांना कोणतीही सुविधा मिळाली नाही, त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही प्रभू म्हणाले.
याबाबत प्रभू म्हणाले की, मुंबईत अनेक ठिकाणी पंप बंद आहेत. नियंत्रण कक्षात फोन कोणी उचलत नव्हते. पावसाळा संपला त्यामुळे यंत्रणा सज्ज नसल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वाटले.
रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तीन तास लोक गाड्यांमध्ये अडकले होते. मधुमेहाचे अनेक प्रवासी देखील गाड्यांमध्ये अडकले होते.
सुनील प्रभू यांनी विभाग प्रमुखांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेच्या (brihanmumbai municiple corporation) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर दोन ते तीन तासांच्या आत, महापालिका प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले होते.
शिवाय, अलीकडच्या काही दिवसांत पाऊस नसल्यामुळे पंप सुरू आहेत की नाही, हे तपासण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. अधिका-यांनी पुढे म्हटले की त्यांना पंपांना पुरेसे डिझेल आणि वीज कनेक्शनची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले होते.
हेही वाचा