Advertisement

भाजपने दाखवला पडळकरांवर विश्वास, दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते म्हणून भाजपने नियुक्ती केली आहे.

भाजपने दाखवला पडळकरांवर विश्वास, दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
SHARES

गेल्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजित पवार यांना आव्हान देणारे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते म्हणून भाजपने नियुक्ती केली आहे. विधान परिषदेच्या आमदारकीपाठोपाठ प्रवक्तेपद देऊन भाजपने पडळकरांवर मोठा विश्वास दाखवला आहे.(mlc gopichand padalkar appointed as a bjp spokesperson for western maharashtra)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे प्रवक्ते आणि पॅनेलिस्ट यांची नियुक्ती सोमवारी १७ आॅगस्ट रोजी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्य प्रवक्ता म्हणून केशव उपाध्ये, भारती पवार (उत्तर महाराष्ट्र), गोपीचंद पडळकर, धनंजय महाडिक (पश्चिम महाराष्ट्र), राम कदम, अॅड. राहुल नार्वेकर (मुंबई), शिवराय कुलकर्णी (विदर्भ), एजाज देखमुख, राम कुलकर्णी (मराठवाडा), भालचंद्र शिरसाट (मुंबई), श्वेता शालिनी (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासोबतच गणेश हाके, अतुल शाह, गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ. अनिल बोंडे, अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, सुरेश धस, प्रदीप पेशकार, निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी, अशा ३३ चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे.  

हेही वाचा - आपण कुणाबद्दल बोलतोय, याचं तरी भान ठेवा, अजित पवारांनी पडळकरांना सुनावलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण करत आहेत. पण या काळात त्यांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवून केवळ राजकारण केलं. बहुजन समाजाला कधीही पुढं येऊ दिलं नाही. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. त्यामुळे पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह असतील असं वाटत नाही. खरं तर पवार यांची कुठलीही विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी टीका काही महिन्यांपूर्वी पडळकरांनी शरद पवारांवर केली होती. यावरून बराच वाद निर्माण झाला होता.

 
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा