Advertisement

“आरे कारशेडसाठी फक्त ७० कोटी खर्च, फडणवीसजी उरलेले ३३० कोटी रुपये कुठं गेले?”

आरे कारशेडसाठी ४०० कोटी रुपये खर्च झाल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा आरे वाचवा आंदोलनाचे पुरस्कर्ते आणि पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी खोडून काढला आहे. एवढंच नाही, तर उरलेले ३३० कोटी रुपये कुठे गेले असा प्रश्नही फडणवीस यांना विचारला आहे.

“आरे कारशेडसाठी फक्त ७० कोटी खर्च, फडणवीसजी उरलेले ३३० कोटी रुपये कुठं गेले?”
SHARES

आरे कारशेडसाठी (aarey carshed) ४०० कोटी रुपये आधीच खर्च झाले असल्याचा दावा करणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा दावा, आरे वाचवा आंदोलनाचे पुरस्कर्ते आणि पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी खोडून काढला आहे. एवढंच नाही, तर उरलेले ३३० कोटी रुपये कुठे गेले असा प्रश्नही फडणवीस यांना विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मेट्रो ३ (metro 3) चं आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याची घोषणा केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. एवढंच नाही तर त्यांनी काही कागदपत्रांच्या आधारे मोठा खर्च वाया जाणार असल्याचा दावा देखील केला.

(mmrcl spend only 70 crore rupees on metro 3 aarey car shed claims environmentalist)

हेही वाचा - मेट्रो कारशेड हलवल्यामुळे ‘इतका’ खर्च वाया?

आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग (kanjurmarg) इथं हलविण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी आणि अहंकारातून घेतलेला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असं याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. जी मेट्रो रेल्वे पुढच्या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली असती, तो प्रकल्प आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झाले आहेत. सरकारने कारशेडच्या कामावर लावलेल्या स्थगितीमुळे १३०० कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. शिवाय कारशेड हलवल्यामुळे ४ हजार कोटींचा वाढीव भार सरकारच्या तिजोरीवर पाडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हे आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी खोडून काढले आहेत. माहिती अधिकारांतर्गत एमएमआरसीकडून मिळवलेल्या आकडेवारीनुसार आरेतील कारशेडच्या कामासाठी ५ कोटी रुपये झाडे कापण्याकरीता, २७ कोटी रुपये जमिनीचं सपाटीकरण करण्यासाठी, २ कोटी रुपये ड्रेनेज लाईन बांधण्याकरीता आणि पाईप लाईन हटवण्यासाठी, १७ कोटी रुपये तात्पुरते शेड्स बांधण्याकरीता, २० कोटी रुपये सीमेंट आणि आरसीसी कामासाठी असे एकूण ७० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर उरलेले ३३० कोटी रुपये कुठे गेले? असा प्रश्न झोरू बाथेना यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - आदित्य ठाकरेंनी केली मेट्रो कारशेडच्या नव्या जागेची पाहणी, म्हणाले...


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा