Advertisement

सर्जिकल स्ट्राईकनंतर निरूपम यांच्यावर मनसेचं पोस्टर'वार'


सर्जिकल स्ट्राईकनंतर निरूपम यांच्यावर मनसेचं पोस्टर'वार'
SHARES

काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीनंतरही मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विटरवरून या हल्ल्याचा निषेध करताना मनसैनिकांना भ्याड, नपूंसक आणि लुख्खे म्हटलं होतं. यामुळे संतापात भर पडलेल्या मनसैनिकांनी निरूपम यांच्या अंधेरीतील निवासस्थानाबाहेर वादग्रस्त पोस्टर्स लावत रोष व्यक्त केला आहे. एवढंच नव्हे, तर वांद्रे येथील काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री शाईफेकही करण्यात आली आहे.


काय लिहिलंय पोस्टरवर?

या पोस्टर्सवर निरूपम यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली आहे. त्यावर निरुपम यांचा उल्लेख 'परप्रांतीय भटका कुत्रा' असा करण्यात आला आहे. संजय निरूपम यांच्या लोखंडवाला येथील घराबाहेर हे पोस्टर लावण्यात आल्याने या दोन पक्षांतील वाद अजून चिघळण्याची चिन्हे आहेत.


वांद्र्यातील कार्यालयावर शाईफेक

काँग्रेसच्या वांद्रे खेरवाडी मधील संपर्क कार्यालयावर रात्री अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली असून काही प्रमाणात तोडफोडही करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी केली. मात्र, हे कृत्य नेमकं कुणी केलं, याचा शोध अजूनही लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांकडून कुणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. मनसेनेही अजून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

संबंधित विषय
Advertisement