Advertisement

घुसखोरांची माहिती द्या आणि ५ हजार मिळवा, मातोश्रीबाहेर मनसेचं पोस्टर

राज्यातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना चक्क बक्षीस जाहीर केलं आहे.

घुसखोरांची माहिती द्या आणि ५ हजार मिळवा,  मातोश्रीबाहेर मनसेचं पोस्टर
SHARES

राज्यातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना चक्क बक्षीस जाहीर केलं आहे. एवढंच नाही, तर या संदर्भातील एक बॅनर मनसेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री (matoshree) निवासस्थानाबाहेर लावल्याने या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हेही वाचा- राज ठाकरेंनी शेअर केला काश्मिरी तरूणीचा व्हिडिओ, जाणून घ्या यामागील कारण

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला ५ हजार रुपयांचं बक्षीस देण्याचं मनसेनं जाहीर केलं. औरंगाबाद मनसेने (mns) सर्वात पहिल्यांदा ही पोस्टर्स शहरभर लावली होती. या पोस्टर्सची चांगली चर्चा झाल्यानंतर राज्यातील इतर ठिकाणीही ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. यापैकी एक पोस्टर मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील कला नगरमध्ये मातोश्री निवासस्थानाबाहेर लावण्यात आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांच्या फोटो असलेल्या या पोस्टरवर  “घुसखोर हटाओ, देश बचाओ. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची अचूक माहिती पुराव्यानिशी देणाऱ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रोख ५००० रुपये देण्यात येतील.” असा मजकूर छापण्यात आला आहे.

मनसेने देशात राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्याच्या मागणीसाठी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथक आणि मानवी तस्करी विरोधी शाखेने मनसेच्या मदतीने २३ बांगलादेशी नागरिकांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली होती. 

मुंबई पाठोपाठ पुण्यातील धनकवडी आणि बालाजीनगर परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी तिघांना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. पण पोलिसांच्या चौकशीत ते तिघेही भारतीय असल्याचं पुढं आल्यानंतर मनसे तोंडघशी पडली होती.

हेही वाचा- भीमा-कोरेगाव, मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे

संबंधित विषय
Advertisement