Advertisement

कुलभूषण जाधव यांच्या समर्थनात मनसेची बाईक रॅली


कुलभूषण जाधव यांच्या समर्थनात मनसेची बाईक रॅली
SHARES

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी कोर्टाने खोट्या आरोपात गुंतवून फाशीची शिक्षा सुनावल्याच्या निषेधार्थ  मनसेच्यावतीने रविवारी भायखळ्यात बाईक रॅली काढण्यात आली होती. 

या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसेचे नगरसेवक दत्ता नरवणकर हे देखील उपस्थित होते. 

ही बाईक रॅली न्यू हिंद मिल म्हाडा वसाहतीपासून सुरू होऊन डीपीवाडी नाका-घोडपदेव येथे समाप्त झाली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. कुलभूषण यांना पुन्हा भारतात आणावे, अशी सर्वच स्तरातुन मागणी होत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा