मनसेचं सुट्ट्या पैशाचं राजकारण

Dadar , Mumbai  -  

दादर - तुम्हाला सुट्टे पैसे हवेत का? हवे असतील तर या रांगेत उभे रहा. होय ही रांग आहे 2000 रुपये सुट्टे करणाऱ्यांची आणि ही सुविधा उपलब्ध करून दिलीय पालिकेचे मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी. मात्र मनसेकडून एवढे पैसे कुठून आले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तरही संदीप देशपांडे यांनी दिले आहे. नोट बंदीमुळे सर्वसामान्य नागरिक, महिला आणि वृद्धांना मोठ्या प्रमाणात त्रासाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे आम्ही सुट्टया पैश्यांची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा मनसे करतंय.

मनसेनं सुट्ट्या पैशाची सुविधा उपलब्ध करून दिल्यानं सर्वसामान्यांना मात्र थोडासा दिलासा मिळालाय. एकूणच काय नोटबंदीवरून कितीही आरोप-प्रत्यारोप होत असले तरी, मनसेन सुट्ट्या पैश्यांची सुविधा उपलब्ध करून देत राजकीय फायदा घेण्यात बाजी मारली, हे मात्र नक्की.

Loading Comments