Advertisement

महाराष्ट्रातच का वाढतोय कोरोना संसर्ग?, राज ठाकरेंनी सांगितलं नेमकं कारण

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोकं आहेत. ज्या राज्यांतून ते येतात तिथं कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तिकडचे आकडे येत नाहीत.

महाराष्ट्रातच का वाढतोय कोरोना संसर्ग?, राज ठाकरेंनी सांगितलं नेमकं कारण
SHARES

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोकं आहेत. ज्या राज्यांतून ते येतात तिथं कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तिकडचे आकडे येत नाहीत, परंतु राज्यात सातत्याने कोरोनाबाधितांचे आकडे वाढत चाललेत, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील कोरोना संसर्गाच्या वाढीसाठी परप्रांतीयांना जबाबदार धरलं आहे. राज ठाकरे (raj thackeray) यांनी कृष्णकुंज निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते.

लाॅकडाऊनसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. लॉकडाऊनवर मला काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची समक्ष भेट घेणार होतो; पण त्यांच्या आसपास अनेक कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत. त्यामुळे आम्ही झूमवर संवाद केला. या चर्चेत आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झालं आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आलं नसतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत असल्याचं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

बाहेरुन येणारी लोकं 

महाराष्ट्रातील (maharashtra) कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येसंदर्भात राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने इथं बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोकं आहेत.ते जिथून येतात तिथं कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी आहे. त्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे समोर येत नाहीत. म्हणून महाराष्ट्रात सातत्याने कोरोनाबाधितांचे आकडे वाढताना दिसतात, असं म्हणत एकप्रकारे राज ठाकरेंनी ठाकरे सरकारची पाठराखण केली.

हेही वाचा- गोरेगाव, वांद्रे आणि चेंबूरमध्ये ७ दिवसात सापडले सर्वाधिक कोरोना रुग्ण

परप्रांतीयांची मोजणी नाहीच

ते पुढं म्हणाले, मागच्या वेळेस जेव्हा लाॅकडाऊन लागलं होतं, तेव्हा मोठ्या प्रमाणात परप्रांतीय महाराष्ट्रातून आपापल्या राज्यांत गेले होते. तेव्हाच मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेव्हा त्यांची मोजणी करा आणि कोरोना (coronavirus) चाचण्या करा. पण यातलं काहीही झालं नाही, असं म्हणत राज्य सरकारवर टीका केली.

बेडसाठी कडक धोरण

अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत.

हॉस्पिटल्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी, आम्ही हॉस्पिटल्सना जबाबदारीची जाणीव करून देऊ शकतो; पण आमची जाणीव करून देण्याची पद्धत वेगळी आहे पण ही ती वेळ नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला शालजोडीतले लगावले.

(mns chief raj thackeray blames migrant workers to spreading covid 19 in maharashtra)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा