Advertisement

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत


राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुवार, १४ जून रोजी मनसेकडून पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत दिली जात आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकर वाहनचालकांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत दिली जाणार आहे.

IMG-20180614-WA0124.jpg

पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या रांगा

केंद्रात असो वा राज्यात भाजप सरकार पेट्रोल दर कमी करण्यात अपयशी ठरत आहे. या पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. पण गुरुवारी सकाळपासून मुंबईमधील ३६ विधानसभा मतदारसंघातील ठरलेल्या प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर पेट्रोलवर ४ रुपये सूट देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळपासूनच पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या रांगा लागत आहे.

आजचा दिवस सामान्य जनतेला सुखाचा आनंदाचा जाईल, सकाळपासून लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून आपली वाहने घेऊन पेट्रोल पंपावर गर्दी करत आहे. राज ठाकरेंना आरोग्यदायी दिर्घ आयुष्य लाभो.
- संदीप देशपांडे मनसे नेते

इंधनदरवाढीमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. असं असताना राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनसेकडून थोडासा दिलासा देण्याचा हा प्रयत्न असल्याचं मनसे विधानसभा अध्यक्ष विजय लिपारे यांनी सांगितलं. पेट्रोलपंपावर फक्त दुचाकीस्वारांना पेट्रोलचा गुरुवारी जो दर असेल, त्याहून 4 रुपये स्वस्त दराने पेट्रोलवाटप केलं जाईल. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान हा उपक्रम राबवण्यात येईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा