Advertisement

राज ठाकरेंनी कापला ईव्हीएमच्या प्रतिकृतीचा केक


राज ठाकरेंनी कापला ईव्हीएमच्या प्रतिकृतीचा केक
SHARES

आपल्या रोखठोक भाषणशैलीने कार्यकर्त्यांसह लाखो चाहत्यांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुरुवारी 14 जून रोजी 50 वा वाढदिवस. यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यकर्ते, चाहते आणि समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी केली. यावेळी राज यांनी EVM ची प्रतिकृती असलेला केकही कापला.


कोणी आणला केक?

केवळ मुंबईतूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंजवर आले होते. यावेळी राज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पालघर येथील मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी EVM ची प्रतिकृती असलेला केक कृष्णकुंजवर आणला. या केकची खासियत म्हणजे त्यावर हीच का ती मतदानातली पारदर्शकता? असा प्रश्न लिहला होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी त्यांना अनोखी भेट म्हणून व्यंगचित्रही दिलं.

Screenshot_20180614-114548.png

याशिवाय मनसेकडून काही ठराविक पेट्रोल पंपावर पेट्रोलवर 4 आणि 9 रुपये सवलतीच्या दरात पेट्रोल उपलब्ध करून दिलं जात आहे. मनसेच्या या उपक्रमामुळे वाहन चालकांच्या खिशाला निश्चितच दिलासा मिळणार आहे.

IMG-20180614-WA0239.jpg


हेही वाचा -

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा