Advertisement

इतिहास भूगोलापासून शिकवा- राज ठाकरे


इतिहास भूगोलापासून शिकवा- राज ठाकरे
SHARES

दादर - 'शोध मराठी' मनाचा या कार्यक्रमाच्या 14 व्या जागतिक मराठी संमेलनाचा सांगता समारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी दादरच्या शिवाजी मंदिरात पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या शिव स्मारकाच्या योजनेवर टीका केली. इतिहास भूगोलापासून शिकवा, शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकविण्यासाठी गड, किल्ले यांची माहिती देणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची गरज काय, काय ढोकळा खायला मुंबईकरांना जायाचे आहे का? मुंबई कोणत्याही परिस्थितीत यांना मिळवायची आहे. बुलेट ट्रेनची गरज मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकाता, मुंबई दिल्ल मध्ये आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी मोदींवर केली.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात देखील करण्यात आले होते. चित्रकार आशुतोष आपटे यांनी यावेळी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी मराठी संमेलनाचे अध्यक्ष अविनाश राचमाले (उद्योगपती, अमेरिका) यांच्यासहित अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा