Advertisement

'ए लाव रे व्हिडिओ' म्हणत राज यांनी घातला 'या' महत्त्वाच्या विषयांना हात

'थप्पड से डर नही लगता साहब, ए लाव रे व्हिडिओ से डर लगता है', असे असंख्य मिम्स आज सोशल मीडियावर फिरत आहेत. ए लाव रे तो व्हिडिओ या राज ठाकरे यांच्या वाक्यानं सत्ताधाऱ्यांमध्ये एक प्रकारची दहशतच निर्माण झाली आहे, पण दुसरीकडे नेटीझन्सचही मनोरंजन होत आहे.

'ए लाव रे व्हिडिओ' म्हणत राज यांनी घातला 'या' महत्त्वाच्या विषयांना हात
SHARES

'थप्पड से डर नही लगता साहब, ए लाव रे व्हिडिओ से डर लगता है', असे असंख्य मिम्स आज सोशल मीडियावर फिरत आहेत. ए लाव रे तो व्हिडिओ या राज ठाकरे यांच्या वाक्यानं सत्ताधाऱ्यांमध्ये एक प्रकारची दहशतच निर्माण झाली आहे, पण दुसरीकडे नेटीझन्सचही मनोरंजन होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या महाराष्ट्रातल्या सभांमधून सुरू शाह मोदी जोडीवर हल्लाबोल करण्यासाठी त्यांच्याच व्हिडिओची मदत घेत आहेत.


मनसेनं जरी लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार दिला नसला तरी मोदी आणि शाह यांचा मनसेनं जोरदार विरोध सुरू केला आहे. यासाठी राज्यभरात त्यांनी आपल्या प्रचारसभांचा सपाटाच लावला आहे. यातून अनोख्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल करण्यास सुरूवात केली. नुकताच हरिसाल या डिजिटल गावातला एक व्हिडिओ दाखवून सरकारच्या डिजिटल इंडिया या योजनेची राज ठाकरे यांनी चिरफाड केली. तसंच सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचं सांगत त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेतलं.

सभांमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी केलेली विधानं आणि सध्याची केलेली विधानं यांचे व्हिडिओ दाखवण्यास सुरूवात केली. यामध्ये केंद्र सरकारनं लोकांची फसवणूक केल्याचं व्हिडिओ पुरावेच जणू सादर केले. त्यामुळे त्याला लोकांची पसंती तर मिळतच आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आता मै भी चौकीदार पेक्षा जास्त ट्रेंड होत आहे. 'ए लाव रे व्हिडिओ' म्हणत राज यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला. 



हेही वाचा -

साध्वीच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

बोल मुंबई: मनसेचा भाजपाविरोधी प्रचार आघाडीच्या पथ्यावर पडणार का? काय आहे तरूणाईचं मत? पहा व्हिडिओ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा