Advertisement

साध्वीच्या उमेदवारीचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, एनआयए न्यायालयाने फेटाळली याचिका

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी असलेली साध्वी सध्या जामीनावर आहे. साध्वी भाजपाकडून मध्य प्रदेशमधील भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवत आहे.

साध्वीच्या उमेदवारीचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, एनआयए न्यायालयाने फेटाळली याचिका
SHARES

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका एनआयए न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे साध्वीला मोठा दिलासा मिळाला आहे. साध्वीला निवडणूक लढण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली होती. ही याचिका फेटाळत या संदर्भातील निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा, असं एनआयए न्यायालयानं म्हटलं आहे. 


मृताचे कुंटुंबीय न्यायालयात

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी असलेली साध्वी सध्या जामीनावर आहे. साध्वी भाजपाकडून मध्य प्रदेशमधील भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवत आहे. साध्वीला निवडणूक लढविण्यास परवानगी देऊ नये व तिचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करत मालेगाव स्फोटात मरण पावलेल्या एका मुलाच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली. 


कोर्टाच्या अखत्यारीत नाही

याचिकाकर्त्यांची मागणी कायद्याला धरून नसल्याचा युक्तिवाद साध्वीच्यावतीनं करण्यात आला आहे.  आता न्यायालयानं ही याचिकाच फेटाळून लावली. एखाद्या आरोपीला निवडणूक लढण्यापासून रोखणं, हा निर्णय कोर्टाच्या अखत्यारीत नाही. याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घ्यावा, असं न्यायमूर्ती विनोद पडाळकर यांनी सुनावणीवेळी म्हटलं आहे. हेही वाचा -

बोल मुंबई: मनसेचा भाजपाविरोधी प्रचार आघाडीच्या पथ्यावर पडणार का? काय आहे तरूणाईचं मत? पहा व्हिडिओ

'राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी मतदानानंतरही सुरू राहावी'- विनोद तावडे
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा