Advertisement

मनसेच्या शिवजयंती कार्यक्रमाला प्रशासनाचा नकार, राज ठाकरे नाराज

१२ मार्चला शिवजयंती निमित्त आयोजित मनसे कार्यक्रमाला प्रशासनानं नकार दिला. राज ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी... काय आहे यामागे कारण? जाणून घ्या...

मनसेच्या शिवजयंती कार्यक्रमाला प्रशासनाचा नकार, राज ठाकरे नाराज
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. १२ मार्चला शिवजयंती निमित्त मनसेनं औरंगाबाद इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे हजेरी उपस्थित राहणार आहेत. परंतु, प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार दिला आहे.


... म्हणून कार्यक्रमाला नकार

गुरुवार आणि शुक्रवार असे २ दिवस राज ठाकरे औरंगाबादमध्ये आहेत. पण गुरुवारी शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या मनसेच्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी दिली नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. यावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


राज ठाकरे संतप्त

राज ठाकरे म्हणाले की, शिवजयंतीला परवानगी का नाही? कोरोना विषाणामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणार का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पॅनिक होण्यासारखं राज्यात घडलेलं नाही. लोकांना का घाबरवत आहात? असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला आहे.   


रुग्णांच्या संख्येत वाढ

कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे फक्त चीनमध्येच साडे तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जगभरात दीड लाखापेक्षा जास्त लोकांना या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हायरस आता महाराष्ट्रात धडकला आहे. महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा वाढून १० वर गेला आहे. बुधवारी मुंबईत कोरोनाचे २ रुग्ण आढळले


कस्तुरबा रुग्णालयात रुग्ण

दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला सर्वात पहिल्यांदा कोरोनाची (Coronavirus update) लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. हे दाम्पत्य सहलीनिमित्त दुबईला गेले होते. त्यानंतर हे दाम्पत्य ज्या विमानाने दुबईहून मुंबईला उतरले त्या विमानातील सर्व महाराष्ट्रातील प्रवाशांचीही चाचणी करण्यात येत आहे. अशा ४० प्रवाशांशी संपर्क साधण्यात आला आहे. सोबतच ज्या टॅक्सीचालकाच्या गाडीत ते बसले होते, त्या टॅक्सी चालकाच्या संपर्कात आलेल्या ७ ते ८ जणांचीही चाचणी करण्यात आली आहे.

यापैकी ६ जणांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (kasturba hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या ६ जणांचे चाचणी अहवाल वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यापैकी चौघांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह, तर दोघांचे चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामुळे मुंबईत पहिल्यांदाच कोरोनाची लागण झालेले २ रुग्ण आढळले आहेत


गर्दीची ठिकाणं टाळा

कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो अधिक वेगानं पसरत आहे. याचावर एकच उपाय म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. त्यामुळेच महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कार्यक्रम रद्द करम्यात येत आहेत.

  



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा