Advertisement

त्यांचा अनुभव मी देखील घेतला, राज ठाकरेंनी सांगितली अहमद पटेलांची आठवण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पटेल यांना आदरांजली वाहिली.

त्यांचा अनुभव मी देखील घेतला, राज ठाकरेंनी सांगितली अहमद पटेलांची आठवण
SHARES

काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोविड-१९ मुळे गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त त्यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विटरवरून दिलं. पटेल यांच्या निधनानंतर देशभरातील नेत्यांनी आपापल्या सहवेदना व्यक्त केल्या. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पटेल यांना आदरांजली वाहिली.

आपल्या फेसबुक वाॅलवर राज ठाकरे (raj thackeray) यांनी लिहिलं आहे की, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल ह्यांचं कोरोनाने निधन झालं. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. 

राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत. ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. 

४३ वर्ष सक्रिय राजकारणात राहूनही आणि अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली.

हेही वाचा- सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी ईडीला देईन, मग बघूया कुणाची चौकशी होते- संजय राऊत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा