Advertisement

सामान्य माणसासारखा जगणारा एकमेवाद्वितीय सुपरस्टार, राज ठाकरेंकडून रजनीकांत यांचं कौतुक

कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन.

सामान्य माणसासारखा जगणारा एकमेवाद्वितीय सुपरस्टार, राज ठाकरेंकडून रजनीकांत यांचं कौतुक
SHARES

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना मानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. त्यावर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी सामान्य माणसासारखा जगणारा एकमेवाद्वितीय सुपरस्टार, अशा शब्दांत त्यांचं कौतुक केलं आहे. 

राज ठाकरे यांनी अभिनेते रजनीकांत यांच्या अभिनंदनपर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन.

हेही वाचा- सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ची घोषणा केली. ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने ३ मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे. महान नायक रजनीकांत यांना २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. रजनीकांत गेली अनेक दशकं सिनेमावर राज्य करत आहेत. अभिनेते, निर्माते आणि लेखक म्हणून त्यांचं सिनेसृष्टीतलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या सर्व निवड सदस्यांनी एकमताने हे नाव निवडलं, असं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. 

रजनीकांत हे १२ वे दाक्षिणात्य कलाकार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी डॉ. राजकुमार, अक्किनेनी नागेश्वरा राव, के. बालाचंदर या ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

(mns chief raj thackeray reaction on dadasaheb phalke award announced to rajinikanth)

हेही वाचा- ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा