Advertisement

सिंहासन नको, सत्ता हवी! मनसैनिकाच्या भेटवस्तूचा राज यांच्याकडून नम्रपणे नकार

एका मनसैनिकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी चांदीचं सिंहासन बनवून शिवाजी पार्क येथील कुष्णकुंज निवासस्थानी आणलं. याबाबत अनिभिज्ञ असलेल्या राज यांनी हे सिंहासन स्वीकारलं नसलं, तरी सिंहासनाची पाहणी करून त्यावर आपली खास स्वाक्षरी देत मनसैनिकाला खूश केलं.

सिंहासन नको, सत्ता हवी! मनसैनिकाच्या भेटवस्तूचा राज यांच्याकडून नम्रपणे नकार
SHARES

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना चांदीचं सिंहासन देत एका सच्च्या शिवसैनिकाने त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता दाखवून दिली होती. अगदी त्याचप्रमाणं एका मनसैनिकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी चांदीचं सिंहासन बनवून शिवाजी पार्क येथील कुष्णकुंज निवासस्थानी आणलं. याबाबत अनिभिज्ञ असलेल्या राज यांनी हे सिंहासन स्वीकारलं नसलं, तरी सिंहासनाची पाहणी करून त्यावर आपली खास स्वाक्षरी देत मनसैनिकाला खूश केलं.


आश्चर्याचा धक्का

पुण्यातील विधाते कुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निस्सीम चाहते आहेत. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंसाठी चक्क एक चांदीचं सिंहासन तयार करून घेतलं. हे सिंहासन घेऊन विधाते कुटुंब शनिवारी सकाळी कृष्णकुंजवर धडकले. हे सिंहासन कुणासाठी आणलं? कुणी बनवण्यास सांगितलं? याची कृष्णकुंजवरील सुरक्षा रक्षकांसह कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. त्यावर हे सिंहासन राजसाहेबांना भेट द्यायचं आहे, असं सांगून हे कुटुंब राज यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत थांबले. ही माहिती राज यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी विधाते कुटुंबीयांचा हिरमोड होऊ नये, म्हणून बाहेर येत अगदी बारकाईने सिंहासनाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हे सिंहासन घेण्यास नम्रपणे नकार दर्शवला.


पुढचा सीएम मनसेचा

बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनीही सिंहासनावर बसून पक्ष चालवावा ही त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. ही पूर्ण होऊ शकली नाही... पण, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मनसेचाच होणार आणि नक्की होणार! असा अभिप्राय आपल्या स्वाक्षरीसह देत राज ठाकरे यांनी आपल्या या चाहत्यांना खूश केलं.

योगायोग असा की शुक्रवारी विश्वसुंदरीच्या सदिच्छा भेटीनिम्मित्तान हिरेजडित मुकुट 'कृष्णकुंज'वर आला होता. त्या त्यापाठोपाठ शनिवारी सिंहासनही आलं. हा योग जुळून आल्याने मनसेची सत्ताही लवकरच यावी, अशी इच्छा कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली नसेल तर नवल !


म्हणून नकार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आलेल्या सिंहासनावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी या सिंहासनाचा त्याग केला होता. त्यानंतर ते लाकडी सिंहासन वापरू लागले होते. असा कुठलाही वाद आपल्या बाबतीत उद्धवू नये, याची दक्षता घेत राज यांनी या चांदीच्या सिंहासनाचा स्वीकार केला नसेल, असा कयास बांधला जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा