Advertisement

परमबीरांना पदावरून हटवल्यावरच १०० कोटींच्या टार्गेटची आठवण कशी झाली?- राज ठाकरे

बार आणि रेस्टाॅरंटकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट अनिल देशमुखांकडून दिलं गेलं हा आरोप लांच्छनास्पद आहे.

परमबीरांना पदावरून हटवल्यावरच १०० कोटींच्या टार्गेटची आठवण कशी झाली?- राज ठाकरे
SHARES

परमबीर सिंह यांना १०० कोटींच्या टार्गेटची आठवण पोलीस कमिशनर पदावरून हटवलं गेल्यावरच का झाली? आधी का नाही झाली? बार आणि रेस्टाॅरंटकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट अनिल देशमुखांकडून दिलं गेलं हा आरोप लांच्छनास्पद आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली. 

राज ठाकरे यांनी कृष्णकुंज निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत लाॅकडाऊन सोबतच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा आहे. अनिल देशमुख (anil deshmukh) हा मुद्दा महत्वाचा नाही. यासंदर्भात चौकशी सुरु झाली की नंतर तुम्ही विसरुन गेलात. तुमच्या बातम्या बंद झाल्या की मग सगळेच विसरुन जाणार. 

मूळ मुद्दा कोणता?

माझ्या परिचयाची एक व्यक्ती आहे. त्यांना गाणं गाण्याची सवय आहे. गाणं गाताना ते तान देतात आणि ती इतकी जाते की नंतर ते मूळ गाणं विसरतात. मगे ते कोणतं गाणं गायचं हे विसरायचे. तुमचं हे सगळं असं सुरु आहे. कशापासून सुरुवात झाली या गोष्टीची हे आपण पाहतच नाही, त्यामुळे माझी माध्यमांना विनंती आहे की मूळ मुद्दा भरकटू देऊ नका, असं म्हणत राज ठाकरे (raj thackeray) यांनी प्रसार माध्यमांना स्फोटक प्रकरणावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.

हेही वाचामहाराष्ट्रातच का वाढतोय कोरोना संसर्ग?, राज ठाकरेंनी सांगितलं नेमकं कारण

राज्य दिलं की आलं?

मला काल एक विनोद एकाने सांगितला, 'सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे? हेच कळत नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील इतर महत्त्वाचे मुद्दे:

  • आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी
  • लॉकडाऊनच्या काळात वीजबिल माफी द्यायला हवी
  • बँकाकडून थकीत कर्जवसुलीचा तगादा थांबायला हवा
  • शाळांची फी निम्मी करा, १०वी, १२वी च्या विद्यार्थ्यांना पास केलं पाहिजे  
  • शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा
  • खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी
  • जीममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी
  • कंत्राटी कामगारांना महापालिकांमध्ये कायमस्वरूपी नोकरी द्यावी
(mns chief raj thackeray slams param bir singh and anil deshmukh over extortion case)
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा