Advertisement

राज ठाकरेंचे शनिवार-रविवारी होणारे मेळावे रद्द, ‘हे’ आहे कारण

मनसे अधिकृतवरून यासंदर्भात माहिती देखील देण्यात आली आहे. पोस्टमध्ये याचं कारण ही देण्यात आलं आहे.

राज ठाकरेंचे शनिवार-रविवारी होणारे मेळावे रद्द, ‘हे’ आहे कारण
SHARES

आगामी महापालीका निवडणुकींनिमित्त मनसेचा पुणे-मुंबईत होणारा कार्यकर्त्यांचा मेळावा आता पुढे ढकलण्याच आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी होणारे मेळावे रद्द झाले आहेत.

मनसे अधिकृतवरून यासंदर्भात माहिती देखील देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार दि.२३/१०/२०२१ रोजी मुंबईत होणारा शाखाअध्यक्षांचा मेळावा आणि दि.२४/१०/२०२१ रोजी पुणे इथं होणारा शाखा अध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील मेळाव्याची तारीख, वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, ही विनंती.


२३ ऑक्टोबरला भांडुपमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार होता. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत ते मार्गदर्शन करणार होते.

मागील विधानसभा तसंच महापालिका निवडणुकीत मनसेला राज्यात फारसे यश मिळाले नव्हते. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसेनं कंबर कसली आहे.

त्यानुसार नाशिक, पुणे, ठाणे मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या ठिकाणी मनसेकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

राजजी स्वत: या महापालिकांकडे बारकाईनं लक्ष देत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत राजजी मार्गदर्शन करतील, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली होती.

मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. यातील ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं मनसेचा फक्त एक नगरसेवक आहे. महापालिकेसाठी मनसेने ६ महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. सर्व नेत्यांना विभागवार जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात अमित ठाकरे यांचाही समावेश आहे.



हेही वाचा

शिवाजी पार्कवरील रोषणाईसाठी 'इटली'तील दिव्यांची गरज काय'? मनसेचा शिवसेनेला सवाल

दिवाळीनंतर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा? माँ कांचनगिरींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा