Advertisement

बुलेट ट्रेनवर पुन्हा धडकलं मनसेचं इंजिन

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला असून 'या प्रकल्पाची गरज नसल्यानं हा प्रकल्प रद्द करावा' अशी मागणी उचलून धरली आहे.

बुलेट ट्रेनवर पुन्हा धडकलं मनसेचं इंजिन
SHARES

'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं सर्वेक्षण होऊ देणार नाही' असा कडक इशारा याआधीच देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी पुन्हा पालघर इथं सुरू असलेलं बुलेट ट्रेनसाठीचं सर्वेक्षण उधळून लावलं आहे. याआधी सोमवारी ठाण्यातील दिवा-शिळ इथं सुरू असलेलं सर्वेक्षण मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत बंद पाडलं होतं.

'यापुढंही जिथं कुठं सर्वेक्षण सुरू करण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणांकडून केला जाईल तिथं मनसे कार्यकर्ते धडकतील आणि सर्वेक्षण बंद पाडतील' असा पुनरूच्चार मनसेकडून करण्यात आला आहे.


सर्वेक्षण बंद पाडलं

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला असून 'या प्रकल्पाची गरज नसल्यानं हा प्रकल्प रद्द करावा' अशी मागणी उचलून धरली आहे. तर जबरदस्तीनं सरकार जमिनी संपादीत करण्यासाठी किंवा सर्व्हेक्षणासाठी आल्यास त्यांना हुसकावून लावण्याचं आवाहनही राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पालघरच्या सभेत केलं होतं. राज ठाकरे यांच्या या आवाहनानुसार सोमवारी दिवा-शिळ इथं ठाणे तहसीलदार कार्यालयाकडून सुरू असलेलं सर्वेक्षण बंद पाडलं होतं. शिवाय अधिकाऱ्यांनाही हुसकावून लावलं होतं.


'बुलेट ट्रेन होऊच देणार नाही'

मनसेच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही यंत्रणांकडून सर्वेक्षणाचं काम ठाणे-पालघर पट्ट्यात रोज कुठं ना कुठं सुरू आहेत. त्यानुसार बुधवारी पालघरमधील टेम्बी-खोडावे इथलं सर्वेक्षण बंद पाडलं. याठिकाणी सर्वेक्षण होणार असल्याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते मनसेचे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत धडकले आणि अखेर टेम्बी-खोडावे इथलंही सर्वेक्षण बंद पाडलं. तर बुलेट ट्रेन होऊच देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मनसेची असल्यानं बुलेट ट्रेनमध्ये मनसेच्या इंजिनचा असाच खोडा राहिला तर बुलेट ट्रेन ट्रॅकवर येण्यास विलंब होण्याची दाट शक्यता झाली आहे.


हेही वाचा - 

मनसेचा ठाण्यात राडा... बुलेट ट्रेनचा सर्व्हे रोखला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा