नगरसेवक निधीतून कचऱ्याचे डबे

 BDD Chawl
नगरसेवक निधीतून कचऱ्याचे डबे
नगरसेवक निधीतून कचऱ्याचे डबे
नगरसेवक निधीतून कचऱ्याचे डबे
नगरसेवक निधीतून कचऱ्याचे डबे
See all

वरळी - मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आल्यानं सगळेच पक्ष या ना त्या कारणानं मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सगळ्या पक्षाचे नगरसेवक कामाला लागलेत. प्रभाग क्रमांक 193 येथील आदर्शनगर येथे मनसे नगरसेवक संतोष धुरी आणि नगरसेविका सीमा शिवलकर यांच्या निधीतून घरगुती वापरासाठी कचऱ्याच्या डब्यांचं वाटप करण्यात आलं. विविध कामं करण्याच्या दृष्टीने का होईना प्रत्येक पक्षाचे नगरसेवक लोकांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान कचरा व्यवस्थापनाचा तिढा सोडवल्याबद्दल आदर्शनगरवासीयांच्या वतीनं संतोष धुरी आणि सीमा शिवलकर यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात येत आहेत.

Loading Comments