SHARE

भांडूप - भांडूप पश्चिम येथील समर्थ मैदानात सोमवारी 14 नोव्हेंबरला विद्यार्थांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. बाल दिनाचं औचित्य साधत ही स्पर्धा ठेवण्यात आलीय. मनसेचे वॉर्ड अध्यक्ष राजेश फडतरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केलय. माझी शाळा, गडकिल्ले, माझ्या स्वप्नातील शिवाजी तलाव हे स्पर्धेचे विषय असून, 5 वी ते 7 वी, 7 वी ते 8 वी आणि 8 वी ते 10 वी या इयत्तेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. संध्याकाळी 4 ते 8 यावेळेत ही स्पर्धा होणार असून, सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी ओळखपत्र आणि चित्र काढण्यासाठी लागणारं साहित्य सोबत आणावं असं आवाहन आयोजकांनी केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या