..तेव्हा फराहने का भूमिका घेतली नाही?

  Pali Hill
  ..तेव्हा फराहने का भूमिका घेतली नाही?
  ..तेव्हा फराहने का भूमिका घेतली नाही?
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - रईस चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेत्रीला घेतल्याबद्दल आर्मी रिलिफ फंडला ५ कोटी रुपये देणार नाही, असं मत निर्माता आणि अभिनेता फरहान अख्तरनं एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केलंय. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून फरहान अख्तरवर टीका केलीये. फरहान अख्तर यांनी आझाद मैदानाजवळ पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली असती, तर त्यांचं कौतुक केलं असतं. तुमच्या सर्व भूमिका मोजून-मापून असतात. मी तुमच्याशी सहमत नाही, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. खोपकर यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास जरी नकार दिला असला, तरी फिल्म जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा याबाबत योग्य निर्णय घेऊ, असं म्हटलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.