Advertisement

सॅनिटरी नॅपकिनच्या वादात मनसेची उडी


सॅनिटरी नॅपकिनच्या वादात मनसेची उडी
SHARES

सॅनिटरी नॅपकिन्सवर लावण्यात येणाऱ्या कराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील आक्रमक झाली आहे. मनसे पदाधिकारी शालिनी ठाकरे यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सॅनिटरी नॅपकिनची भेट दिली.

बचत गटांसोबतच सरकारने देशी बनावटीच्या सॅनिटरी नॅपकिन्सवरील जीएसटी मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन त्यांनी अर्थमंत्र्याना दिले. मासीक पाळी दरम्यान महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तरीही सरकार सॅनिटरी नॅपकिन्सवर कर लावत आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.


सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागू केल्यापासून आम्ही त्या विरोधात लढत आहोत. या संदर्भात आम्ही जून महिन्याच्या सुरुवातीला अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले. बचत गटांसोबतच इतर स्वावलंबी गट, सॅनिटरी नॅपकिनचे देशातील उत्पादक यांनाही जीएसटीतून वगळण्याची मागणी केली. परंतु सरकार शालेय विद्यार्थिनींना सवलत देऊन या विषयातून पळवाट काढू पाहात आहे.


शालिनी ठाकरे, मनसे नेत्या



हे देखील वाचा -

आता 'बचत गटां'नी बनवलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी नाही!

सॅनिटरी नॅपकिन्स GST तून वगळा, लातूरकर महिलेचे मुंबईत उपोषण



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा