आता 'बचत गटां'नी बनवलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी नाही!

Mumbai
आता 'बचत गटां'नी बनवलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी नाही!
आता 'बचत गटां'नी बनवलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी नाही!
आता 'बचत गटां'नी बनवलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी नाही!
See all
मुंबई  -  

राज्यातील बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी आकारण्यात येणार नाही, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यावर उपोषणकर्त्या छाया काकडे आपले उपोषण मागे घेतले.

सॅनिटरी नॅपकिन्स जीएसटीतून वगळण्यात यावेत, या मागणीसाठी लातूरच्या छाया काकडे विचारधारा संस्थेच्या सहकाऱ्यांसोबत आझाद मैदानात उपोषण करत होत्या.

या उपोषणाची दखल घेत राज्यातील बचत गट जे उत्पादन तयार करतील, त्या उत्पादनांवर जीएसटी कर लागू होणार नसल्याचे, आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.महाराष्ट्रातील बचत गट जे सॅनिटरी नॅपकिन्स तयार करतील, त्या उत्पादनावर कुठलाही कर न लावण्याचे, शाळांमध्ये सॅनिटरी व्हेंडिंग मशीन्स बसवण्याचे, आश्वासन आम्हाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, त्यामुळे हे उपोषण आम्ही मागे घेतले आहे.
- छाया काकडे, सामाजिक कार्यकर्त्याग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याचे प्रमाण कमी आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सॅनिटरी नॅपकिनच्या वापरासाठी महिलांमध्ये जनजागृती करावी लागते.
मुख्यत: किमतीमुळे हे नॅपकीन वापरणे महिला टाळतात. त्यातच ‘जीएसटी’चा भार पडल्यास नॅपकिनच्या वापरात अधिक घट होईल. त्यामुळे उपोषण करण्याचा पवित्रा लातूरच्या छाया काकडे आणि विचारधारा संस्थेच्या सहकाऱ्यांनी घेतला होता.

बचतगटातील महिलांना रोजगार मिळावा हा प्रस्ताव देखील आम्ही अर्थमंत्र्यांपुढे ठेवला होता. या प्रस्तावाला 7 ते 8 महिने लागतील, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिल्याचेही काकडे यांनी सांगितले.हे देखील वाचा -

सॅनिटरी नॅपकिन्स GST तून वगळा, लातूरकर महिलेचे मुंबईत उपोषण

मासिक पाळीवर मोकळेपणानं बोला!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.