Advertisement

खड्ड्यात दुचाकी चालवण्यालाही साहसी खेळाचा दर्जा द्यावा, मनसेची मागणी

खड्ड्यावरून मनसेनं एकनाथ शिंदेंना लगावला टोला...

खड्ड्यात दुचाकी चालवण्यालाही साहसी खेळाचा दर्जा द्यावा, मनसेची मागणी
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकताच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून मनसेने त्यांना टोला लगावला.

डोंबिवलीतील खड्ड्यात दुचाकी चालवणे यालाही साहसी खेळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी मनसेने (MNS) पोस्टच्या माध्यमातून केली आहे. मनसे जिल्हा संघटक राहुल कामत यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत शिंदे सरकारवर निशाणा साधला.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी आजही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. मुख्यतः टिटवाळा, कल्याण पूर्व, डोंबिवली, २७ गाव येथील रस्त्यांवर खड्डे आहेत. भोपर परिसरात आणि ठाकुर्लीमध्ये रस्ताच दिसत नाही.

तर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एमएसआरडीसी या रस्त्यांवर खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम होत आहे. कल्याण-शीळ रोडवरील पलावा येथील पूल आणि पलावा जंक्शन येथे खड्डे असल्याने ट्रॅफिक जाम होत आहे. यावरून मनसेने शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा