...तर आम्ही कायदा हातात घेऊ - संदीप देशपांडे

 Mumbai
...तर आम्ही कायदा हातात घेऊ - संदीप देशपांडे
Mumbai  -  

निवडणुकांमध्ये अपयशी ठरलेल्या मनसेची पुन्हा एकदा चर्चेत राहण्यासाठी धडपड सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या वादात उडी घेतल्यामुळे मनसे प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चेत होती. ही चर्चा शांत होते न होते तोपर्यंत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शाकाहारी-मांसाहारी असा भेदभाव करणाऱ्या बिल्डरांना लक्ष्य करत नव्या वादात उडी घेतली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी श्री चामुंडा रिअॅल्टर्स यांना शनिवारी नोटीस बजावली आहे. संदीप देशपांडे यांनी या नोटीसच्या मध्यातून चामुंडा बिल्डर यांना शाकाहारी-मांसाहारी हा भेद करत आपण सदनिका विक्री करु शकत नाहीत यावर खडे बोल सुनावले आहेत. त्याच बरोबर हे नियम बदलले नाहीत तर मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करू असा इशाराही देशपांडे यांनी दिला.

आम्ही बजावलेल्या नोटीसचे उत्तर आले आहे. असे प्रकार केले जाणार नाहीत असे बिल्डराकडून सांगण्यात आले आहे. जर महापालिकेने नियम केले नाहीत, तर आम्ही कायदा हातात घेऊ

- संदीप देशपांडे, नेते, मनसे

Loading Comments