Advertisement

राजाला साथ हवी वेबसाइटची


SHARES

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे टेक्नोसॅव्ही आहेत, हे 'राज' राहिलेलं नाही. जिन्स परिधान केलेला तरुण शेतकरी शेतात ट्रॅक्टर चालवतोय, हे स्वप्न पाहणाऱ्या आणि सर्वसामान्यांची नाळ आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरे यांचं किती कौतुक झालं होतं. मात्र नंतर काहीतरी बिनसलं. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे राज तंत्रकुशल होण्याची सुरुवात स्वतःच्या पक्षापासून करायला हवी, हे बहुदा विसरले. हे आम्ही नाही, मनसेचे गेले अनेक दिवस निपचित पडलेले अधिकृत संकेतस्थळ सांगतेय.

सध्या राजकारणात चाचपडणाऱ्या मनसेची दशा सुधारण्यासाठी पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनाची दिशा बदलण्याचा पर्याय राज यांनी अवलंबला. 2012 सालच्या पालिका निवडणुकीत मनसे कडे किंगमेकर पार्टी म्हणून पाहिलं गेलं होतं. आज पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर मनसे सत्तेच्या स्पर्धेतून दूर फेकली गेल्याचं चित्र आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणूक प्रचारात समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करुन घेत असताना तंत्रकुशल नेता अशी ओळख जपणारे राज ठाकरे आपल्या पक्षाचं संकेतस्थळ प्रदीर्घ काळ नूतनीकरणाच्या प्रतिक्षेत कसे ठेऊ शकतात? हा राजकीय विश्लेषकांच्याही आकलनापलीकडचा प्रश्न झालाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा