Advertisement

“‘एमआयएम’च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का?”

‘एमआयएम’च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का?, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे.

“‘एमआयएम’च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का?”
SHARES

संभाजी नगरमध्ये लाॅकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलिल आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. ‘एमआयएम’च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का?, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. 

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या वाढत चालल्याने ३१ मार्च ते ९ एप्रिल असा १० दिवसांच्या मर्यादित कालावधीसाठी लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र हा लाॅकडाऊन रद्द करण्यात आल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या घोषणेनंतर औरंगाबादमधील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर एमआयएम पक्षाने मोठा जल्लोष केला.

हेही वाचा- कोरोना रुग्णासाठी बेड पाहिजे?, 'या' नंबरवर त्वरीत संपर्क साधा

त्यावर भाष्य करताना अमेय खोपकर यांनी इम्तियाज जलिल (imtiyaz jaleel) यांना सुनावलं आहे. "एमआयएम’च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजी नगरमध्ये लाॅकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलिल आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजी नगरमध्ये रुग्णांची संख्या वाढतेय. परिस्थिती गंभीर आहे. असं असताना, असा जल्लोष करताना, नाचताना शरम वाटायला पाहिजे."

"हा तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे व्हायरस वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, असं ट्विट खोपकर यांनी केलं आहे."

औरंगाबादमधील लाॅकडाऊनला एमआयएमचा मोठा विरोध होता. केवळ उद्योजकांना खूश करण्यासाठी हा लाॅकडाऊन लावण्यात येत असून लाॅकडाऊन मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी दिला होता. तर भाजप आणि मनसेने (mns) ही लॉकडाऊनला विरोध केला होता. 

(mns leader amey khopkar slams imtiaz jaleel on aurangabad lockdown)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा