Advertisement

मनसे नेते अमित ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल

अंगात ताप असल्यामुळं खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काळजीचं कुठलंही कारण नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

मनसे नेते अमित ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास मनसे नेते अमित ठाकरे (amit thackeray) यांना वांद्रे (bandra) येथील लिलावती (lilavati hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंगात ताप असल्यामुळं खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काळजीचं कुठलंही कारण नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

मागील २ दिवसांपासून अमित ठाकरेंना ताप जाणवत होता, प्रामुख्यानं त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे, मलेरिया चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु खबरदारी म्हणून त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या काळात अमित ठाकरे यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. अंगणवाडी सेविकांचा प्रश्न त्यांनी राज्य सरकारकडे मांडल्या होत्या, त्यानंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळानेही अमित ठाकरेंची भेट घेऊन अपुऱ्या वेतनाबाबत समस्या मांडली होती, त्यानंतर अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याबाबत पत्र लिहिलं होतं, आरे येथील मेट्रो कारशेड बाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं अमित ठाकरेंनी स्वागत केलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा