चेंबूरमधील मनसेचे शाखा अध्यक्ष सेनेत

 Chembur
चेंबूरमधील मनसेचे शाखा अध्यक्ष सेनेत
Chembur, Mumbai  -  

चेंबूर - मनसेच्या पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करणारे चेंबूरमधील मनसेचे शाखा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. चेंबूरमधील वाशी नाका येथे राहणारे जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात देखील सक्रिय आहेत. 2017 च्या पालिका निवडणुकीत पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना डावलून दुसऱ्याच नवख्या तरुणाला उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले जाधव यांनी बुधवारी मातोश्री येथे जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मनसेला रामराम करत शिवसेनेत एंट्री केली आहे.

Loading Comments