Advertisement

“आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव”, मनसेची खोचक टीका

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून काही अपेक्षाच नसल्याने अपेक्षाभंगही झाला नाही, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

“आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव”, मनसेची खोचक टीका
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी रविवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. परंतु मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून काही अपेक्षाच नसल्याने अपेक्षाभंगही झाला नाही, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी, असं ट्वीट संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या भाषणा पूर्ण रोख हा कोरोनाच्या राज्यातील स्थितीवर केंद्रीत होता. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ द्यायची नसेल, तर प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. प्रशासनाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा- महाविकास आघाडीच्या मंत्र्याने दिले कडक निर्बंधांचे संकेत

परंतु कोरोनासोबतच राज्यातील जनतेला वाढीव वीज बिलांचा मोठा प्रश्न सतावत आहे. सरकारने आधी वीज बिलात सवलत देण्याचे संकेत दिले होते. परंतु आता ग्राहकांना वाढीव वीज बिल भरावंच लागले. महावितरणची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आणि केंद्राकडूनही काहीच मदत मिळत नसल्याने कुणालाही सवलत देता येणार नाही, हे सरकारने स्पष्ट केलं आहे. यामुळे राज्यातील राजकारणाला जोर चढला आहे. यावर मुख्यमंत्री काही भाष्य करतील अशी अपेक्षा अनेकांना होती. परंतु तसं झालं नाही.

त्याशिवाय मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा निर्णय देखील अद्याप प्रलंबितच आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांकडून माहिती मिळणं अपेक्षित होतं. परंतु त्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं नाही.

त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही, असं (mns) संदीप देशपांडे यांनी म्हटलं. 

(mns leader sandeep deshpande criticised maharashtra cm uddhav thackeray speech)

हेही वाचा- वीज ग्राहक आमचा देव, पण, वाढीव वीज बिलांवरून ऊर्जामंत्री म्हणाले...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा