Advertisement

शिवसेनेच्या उमेदवाराबद्दल काय म्हणाले संदीप देशपांडे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी गुरुवारी माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे उपस्थित होते.

शिवसेनेच्या उमेदवाराबद्दल काय म्हणाले संदीप देशपांडे?
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी गुरुवारी माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे उपस्थित होते. यावेळी आपल्याला दादर आणि माहीमचा विकास करायचा असल्याचं देशपांडे म्हणाले.  

प्रतिष्ठेची लढत

उमेदवारी अर्ज भरण्याआधी देशपांडे यांनी प्रभादेवीतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर रॅली काढत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. मनसे कार्यकर्त्यांनी रॅलीत मोठया प्रमाणात गर्दी केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये रहात असल्याने देशपांडे यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी मनसेचे उमेदवार नितीन सरदेसाई यांचा पराभव केला होता.  

काय म्हणाले देशपांडे?

शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात दादरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. दादरमधील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. बिल्डर काम अर्धवट सोडून निघून गेले आहेत. पार्किंगची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. मतदारांनी संधी दिल्यास हे सर्व प्रश्न मार्गी लावून दादरचा विकास करू, असं आश्वासन संदीप देशपांडे यांनी दिलं आहे.  

या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असली तरी येथील मराठी मतदारांनी २००९ च्या निवडणुकीत मनसेच्या सरदेसाईंना विजयी कौल दिला होता. त्यामुळे येथील लढत रंगतदार लढत होईल, अशी अपेक्षा आहे.



हेही वाचा-

मनसेची २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 'हे' आहेत उमेदवार

मनसेचे आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा