मनसेकडून अल्पदरात धान्यवाटप

कुर्ला - ऐन दिवाळीच्या काळात गरिबांना महागाईची झळ पोहचू नये. त्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी कुर्ल्यात मनसेने अल्प दरात धान्य विक्री केलेय. यावेळी साखर, तांदूळ, तूरडाळ, रवा, मैदा, गहू, तेल, तूप अश्या गृहपयोगी वस्तूंची विक्री केली गेली.

 केवळ दिवाळी सणापुरता हा उपक्रम मर्यादीत नाही तर गेले 11 महिने हा उपक्रम संजय तुडसे राबवतायत. खुल्या बाजारात बाराशे ते सोळाशे रुपयांना मिळणारं दहा किलो धान्य संजय तुडसे मात्र केवळ 900 रूपयांमध्ये देतायत. गगनाला भिडलेली तुरडाळ इथे केवळ 100 रूपयात उपलब्ध आहे. आतापर्यंत थोडं थोडंक नाही तर 40 टन धान्याचं वाटप केलं गेलय.

Loading Comments