Advertisement

'पद्मावत'ला पाठिंबा? छे... हे तर शालिनी ठाकरेंचं वैयक्तिक मत- खोपकर


'पद्मावत'ला पाठिंबा? छे... हे तर शालिनी ठाकरेंचं वैयक्तिक मत- खोपकर
SHARES

'पद्मावत' सिनेमावरून देशभरात वादविवाद सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ''पद्मावत सिनेमा प्रदर्शित होण्यापासून रोखण्याचा कुणी प्रयत्न केल्यास मनसे त्याला संरक्षण देईल'', असं वक्तव्य मंगळवारी केलं होतं. मात्र ही मनसेची अधिकृत भूमिका नसून हे शालिनी ठाकरेंचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्याचं सहकारी नेत्याच्या विरोधात बुधवारी 'भूमिका' घेतली.


काय म्हणाल्या होत्या?

'पद्मावत’ सिनेमाला सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाने प्रदर्शनास परवानगी दिलेली असतानाही करणी सेनेने सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी 'भारत बंद'ची हाक देणं निश्चितच चुकीचं आहे. मुंबईसह राज्यात ‘पद्मावत’ला आवश्यकता भासल्यास मनसे संरक्षण देईल, असं ठाकरे म्हणाल्या होत्या.


जबाबदारी मनसेची नाही

मात्र यामुळे याआधी विविध कारणांवरून काही सिनेमे बंद पाडण्यासाठी 'खळ्ळ खट्याक' करणाऱ्या मनसेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं. तेव्हा पुढे येत शालिनी ठाकरेंचं हे वैयक्तिक मत असल्याचा दावा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला. तसंच सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी मनसेची नाही, असा खुलासाही केला.


विसंवाद चव्हाट्यावर

याचसोबत मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी देखील ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं जाहीर केलं. यासंदर्भात शालिनी ठाकरे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. पद्मावतला महाराष्ट्रात आणि मुंबईत सरंक्षण मिळेल की नाही याबाबत उत्तर देता येत नसलं तरी मनसेमधील विसंवाद यामुळे नक्कीच चव्हाट्यावर आला आहे.



हेही वाचा-

मुंबईत पद्मावतला 'मनसे' संरक्षण!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा