Advertisement

मुंबईत पद्मावतला 'मनसे' संरक्षण!

मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये 'पद्मावत' प्रदर्शित होण्यापासून रोखण्याचा कुणी प्रयत्न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सिनेमाला संरक्षण देईल, असं वक्तव्य मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केलं आहे.

मुंबईत पद्मावतला 'मनसे' संरक्षण!
SHARES

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमाला विरोध करत करणी सेनेने मुंबईसह देशभरात हा सिनेमा कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी दिली आहे. मात्र मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये 'पद्मावत' प्रदर्शित होण्यापासून रोखण्याचा कुणी प्रयत्न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सिनेमाला संरक्षण देईल, असं वक्तव्य मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केलं आहे.


प्रदर्शनाला विरोध चुकीचा

'पद्मावत’ला सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाने प्रदर्शनास परवानगी दिलेली असतानाही करणी सेनेने त्याला विरोध करणं चुकीचं आहे तसंच सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी 'भारत बंद'ची हाक देणं तर निश्चितच चुकीचं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात ‘पद्मावत’ला आवश्यकता भासल्यास मनसे संरक्षण देईल. एवढंच नाही, तर सिनेमाचे दिग्दर्शक-कलावंतांनाही संरक्षण देण्यात येईल, असं ठाकरे म्हणाल्या.


मनसेची भूमिका काय?

एखाद्या सिनेमात मुंबई ऐवजी बाॅम्बे शब्द वापरला असेल किंवा शस्त्रूराष्ट्र पाकिस्तानी कलावंतांनी भूमिका केली असेल, तरच आम्ही संबंधित सिनेमावर आक्षेप घेतल्याचं सांगत ठाकरे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली.


'सिनेमॅटिक लिबर्टी' घेणारच

ऐतिहासिक सिनेमांना विरोध करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, असे सिनेमे म्हणजे काही ऐतिहासिक माहितीपट Historic Documentary नसतात. सिनेमा बनवताना लेखक-दिग्दर्शक काही प्रमाणात का होईना 'सिनेमॅटिक लिबर्टी' घेणारच, असं त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

'पद्मावत'च्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सरसावली!

'पद्मावत'विरोधात सेन्साॅर बोर्डाच्या आॅफिससमोर करणी सेनेचं आंदोलन, ९६ जणांना अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा