Advertisement

राज ठाकरेंची तोफ पुन्हा पुण्यात धडाडणार, परवानगीसाठी पोलिसांना पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची पुन्हा एकदा तोफ धडाडणार आहे.

राज ठाकरेंची तोफ पुन्हा पुण्यात धडाडणार, परवानगीसाठी पोलिसांना पत्र
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची पुन्हा एकदा तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुढील सभेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.

21 ते 28 मे च्या दरम्यान ही सभा पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील लिहिले आहे.

औरंगाबादेत विराट सभा झाल्यानंतर आता पुण्यातही सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करतील. महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर ही सभा महत्वाची मानली जात असून, पुन्हा एकदा मनसेचा भोंगा या सभेत वाजणार आहे.

राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसाठी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सर परशुराम महाविद्यालयाच्या (एसपी कॉलेज) मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. पुण्याच्या या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलतात आणि काय विधाने करतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहे. औरंगाबाद येथे झालेल्या सभेतच राज ठाकरे यापुढे सर्व सभा मराठवाड्यात घेणार आहे. विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही सभा घेणार आहे. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे.



हेही वाचा

जेव्हा भोजपुरीत बोलू लागले देवेंद्र फड़णवीस...!

राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचाची केस : उद्धव ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा