Advertisement

राज ठाकरेंनी घेतलं आदिवासी पाड्यात जेवण...


राज ठाकरेंनी घेतलं आदिवासी पाड्यात जेवण...
SHARES

महाराष्ट्र दिनाचे अौचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मेपासून राज्यभर दौरे करण्यास सुरुवात केली अाहे. महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची वसईच्या चिमाजी अाप्पा मैदानात सभा झाली होती. राज ठाकरे सध्या पालघर दौऱ्यावर असून त्यांनी पालघर येथील अादिवासी पाड्यात जाऊन मनसैनिक रवी जाधव यांच्या घरी जेवण केल्याचा फोटो अापल्या अधिकृत ट्विटर हँडलवर टाकला अाहे. सध्या या फोटोची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगलेली असताना राज ठाकरे यांनी मात्र अापल्या तमाम चाहत्यांचे मन जिंकले अाहे. यामुळे राज ठाकरे यांचे ट्विटरवरील फाॅलोअर्समध्येही वाढ झाली अाहे.


चटईवर बसून मारला जेवणावर ताव

राज ठाकरे यांनी वाडा तालुक्यात असलेल्या कुंतल या गावातील ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी रवी जाधव यांच्या घरी जेवण घेतले. चटईवर बसून राज ठाकरे यांनी जेवणावर ताव मारला. यावेळी त्यांच्या शेजारी बाळा नांदगावकर अाणि मनसेचे इतर नेतेही दिसत अाहेत.


फोटोवर लाइक्सचा पाऊस

राज ठाकरे यांनी ट्विटरवर एंट्री घेतल्यानंतर त्यांनी पोस्ट केलेल्या या फोटोला नेटकऱ्यांनी अनेक लाइक्स दिल्या अाहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दलित बांधवांच्या घरी जाऊन जेवण घेतले होते. आता राज ठाकरे यांनीही याच नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकले अाहे. एकामेकांमध्ये मिसळण्यासाठी लोकांमध्ये जाऊन जेवण करणे, ही फार पूर्वीपासूनची पद्धत आहे. या लंच डिप्लोमसीमुळे माणसे जवळ येतात, असे म्हणतात. राज ठाकरे यांनीही ही लंच डिप्लोमसी अवलंबली अाहे.


हेही वाचा -

गुजरातचा मुंबई हडपण्याचा डाव- राज ठाकरे

नाणारची जमीन परप्रांतीयांच्या ताब्यात कशी? राज ठाकरे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा