Advertisement

नाणारची जमीन परप्रांतीयांच्या ताब्यात कशी? राज ठाकरे

हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातमध्ये नेऊ, असं केंद्र सरकार म्हणतं, मग त्यांना देशातलं दुसरं राज्य दिसत नाही का? राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार सांग काम्या सरकार आहे. केंद्रातून जे सांगितलं जाईल, तेवढंच काम ते करतात. केंद्राविरूद्ध ब्र काढायचीही त्यांची हिम्मत होत नाही, अशी टिकाही राज यांनी केली.

नाणारची जमीन परप्रांतीयांच्या ताब्यात कशी? राज ठाकरे
SHARES

नाणार प्रकल्प जाहीर होण्याआधी तिथं परप्रांतीय गुजराती, मारवाडी लोकांनी जमिनी विकत कशा घेतल्या? हा संशोधनाचा विषय आहे. या साऱ्या प्रकल्पाची चौकशी व्हायला हवी. सद्यस्थितीत चौकशी करूनही न्याय मिळत नाही, हे लोया प्रकरणाचं काय झालं? त्यावरून दिसतंच आहे. त्यामुळे विरोधकांनी याबाबत पुढाकार घेऊन प्रकरणाच्या मूळाशी जायला हवं, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना नोंदवली.

देवेंद्र सरकार सांग काम्या

हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातमध्ये नेऊ, असं केंद्र सरकार म्हणतं, मग त्यांना देशातलं दुसरं राज्य दिसत नाही का? राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार सांग काम्या सरकार आहे. केंद्रातून जे सांगितलं जाईल, तेवढंच काम ते करतात. केंद्राविरूद्ध ब्र काढायचीही त्यांची हिम्मत होत नाही, अशी टिकाही राज यांनी केली.

काय म्हणाले राज?

  • मी आधीच सांगितलंय की पंतप्रधान मोदी हे भारताचे नाही, तर गुजरातचे पंतप्रधान आहेत.
  • कोकणातील नाणार प्रकल्प जाहीर होण्याआधाची इथल्या जमिनी परप्रांतीयांनी कशा खरेदी केल्या?
  • गुजराती, मारवाड्यांना महाराष्ट्रातील जमिनी खरेदीमागे नेमका काय उद्देश आहे? त्यांना कसं काय कळलं की असा कुठला प्रकल्प तिथं येतोय.
  • हा सर्व महाराष्ट्रातील जमिनी बळकावण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.
  • पण, अशा लोकांची चौकशी करायची म्हटलं तरी न्यायमूर्ती लोया प्रकरणात काय झालं हे आपण पाहिलंच आहे.
  • त्यामुळे या प्रकरणी विरोधकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. काही मोजके माध्यम प्रतिनिधी सरकारविरोधात बोलत आहेत. त्यांनीही या प्रकरणाच्या मूळाशी जाणं गरजेचं आहे.

हेही वाचा-

'नाणार' होऊ नाय देणार! मनसेनं फोडलं ताडदेवमधलं प्रकल्पाचं कार्यालय

मनसेच म्हणतेय, फेरीवाल्यांचे लवकर पुनर्वसन करा!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा