Advertisement

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राज ठाकरेंची मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राज ठाकरेंची मागणी
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. 

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची तातडीची मदत द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. पंचनामे होत राहतील. आधी शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना मदत द्या, अशी आक्रमक मागणी राज ठाकरे यांनी केलीय.

मराठवाड्यात पूरस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीनं मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं आहे. केवळ पोकळ आश्वासनं देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे.

यंदाच्या पावसाळ्यात ४३६ लोकांना आपला प्राण गमवावा लागला, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे. कोरोनामुळे सातत्यानं लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारनं घेतली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली. मुख्यमंत्री सुद्धा मराठवाडा दौऱ्यावर जाणार, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.



हेही वाचा

अतिवृष्टीमुळे राज्याचं प्रचंड नुकसान; केंद्रानं ७००० कोटी मदत द्यावी - वडेट्टीवार

चिपी विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा