Advertisement

चिपी विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार

काही दिवसांपूर्वीच नारायण राणे म्हणाले होते की, चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं काही नाही.

चिपी विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार
SHARES

चिपी विमानळाचं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे म्हणाले होते की, चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं काही नाही.

चिपी विमानतळाच्या उद्घघाटनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याची कार्यक्रम पत्रिकाही छापण्यात आली आहे. कार्यक्रम पत्रिकेनुसार येत्या ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं लोकार्पण होणार आहे. त्याच दिवशी १२.३० वाजता या विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे.

कार्यक्रम पत्रिकेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वात वर आहे. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव आहे. तर राणेंचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. अर्थात प्रोटोकॉलनुसार हा क्रम देण्यात आला आहे. या आधी राणेंनी चिपीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं काही नाही असं म्हटलं होतं.

राणेंनी ७ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची नवी तारीखही जाहीर केली. विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर असं काही नाही.

मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही, असं ते म्हणाले होते. त्यावरून गदारोळ उठला होता. शिवसेनेनंही राणेंवर जोरदार टीका करताना हा अधिकार त्यांना कुणी दिला असा सवाल केला होता.



हेही वाचा

भाजपा मनोरंजन करताना सिनेमागृहे, नाट्यगृहे उघडण्याची गरजे काय? -संजय राऊत

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातच अनेक ‘शक्ती कपूर’ - अतुल भातखळकर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा