Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित? 'या' कारणाची होतेय चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा कदाचित स्थगित होण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित? 'या' कारणाची होतेय चर्चा
SHARES

गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष  राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा कदाचित स्थगित होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे.

पुणे (Pune) दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला पुणे दौरा अर्धवट सोडला आणि ते मुंबईला (Mumbai) परतले होते. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्याबाबतीत शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच राज ठाकरे दौऱ्याबाबत अधिकृत माहिती काही वेळात देतील अशी माहिती मिळत आहे.

मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र प्रकृती अस्वास्थामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे.

"आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं", असं भाजप खासदार म्हणतात. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता.

राज ठाकरे यांची पुण्यातील सभा 21 मे रोजी होणार होती. पण आता ही सभा २२ मे रोजी होणार आहे. पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. पावसामुळेनागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज ठाकरे यांनी २१ मे ची सभा २२ मे रोजी घेण्याचा निर्णय घेतला. 



हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यातील सभा 'या' तारखेला होणार

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा