‘ट्री हाऊस’विराेधात मनसेचा मोर्चा

बोरीवली पूर्व - येथील दत्तपाडा परिसरातील ट्री हाऊस शाळा बंद झाल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे पालकांसोबत मनसे कार्यकर्त्यांनी ट्री हाऊस शाळा प्रशासनाच्या विरोधात बोरीवली पूर्व मध्ये मोर्चा काढला आणि व्यवस्थापनाचा निषेध केला. त्यानंतर व्यवस्थापनाच्या विरोधात कस्तुरबा पोलीस ठाण्यात या प्रकरणी निवेदन देण्यात आलं. व्यवस्थापनाकडून ट्री हाऊस शाळा शैक्षणिक वर्ष संपण्यापुर्वी मध्येच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया जाणार आहे.

Loading Comments