मनसेचा दणका

 BDD Chawl
मनसेचा दणका
मनसेचा दणका
मनसेचा दणका
मनसेचा दणका
See all
BDD Chawl, Mumbai  -  

वरळी - मनसे सरचिटणीस आशाताई मामिडी आणि शाखा क्रमांक १९१चे शाखा अध्यक्ष उत्तम सांडव यांच्या नेतृत्वाखाली शनिवार वरळी डेरी कामगार वसाहतीचे निरीक्षण करण्यात आले. तसेच इमारतीच्या दुरवस्थेबाबत दुग्ध विकास आयुक्त डी. डी. कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. परिणामी दुसऱ्याच दिवशी या वसाहतीतील इमारत क्र. १ ते १६ मध्ये कुलकर्णी यांनी घरोघरी पाहणी केली. त्यानंतर अहवाल सादर करण्यात आले. उपस्थित कामगार वर्ग आणि रहिवाशांना आयुक्त कुलकर्णी यांनी सदर समस्यांवर सकारात्मक कारवाई करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे रहिवाशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

Loading Comments