मनसेमध्येही बंडखोरी


SHARE

घाटकोपर - प्रभाग 127 मधून मनसेच्या घाटकोपर (प.) इथले विभागप्रमुख गणेश भगत यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे मनसेतील 127 चे शाखा अध्यक्ष शरद भावे यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत मनसेला रामराम ठोकलाय. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या समर्थकांनी देखील मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. आता ते प्रभाग 127 मधूनच अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. ‘पक्ष स्थापनेपासून पक्षासाठी काम केल्यानंकतरही उमेदवारी मिळाली नाही. मनसेमध्ये पक्षासाठी काम करणाऱ्यांची पक्षात कदर केली जात नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसंच अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असल्याचंही शरद भावे यांनी सांगितले’. भावे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असेला तरी त्यांची मनधरणी करून त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले जाईल असं मनसेचे घाटकोपर (प.) इथले विभागप्रमुख गणेश भगत यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या