Advertisement

मनसेचे 'ते' ६ नगरसेवक महापालिकेत परतले, भगवे फेटे बांधून शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन


मनसेचे 'ते' ६ नगरसेवक महापालिकेत परतले, भगवे फेटे बांधून शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन
SHARES

मुंबई महापालिकेतील मनसेच्या ६ नगरसेवकांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला कोकण विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर मागील महापालिका सभागृहात महापौरांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यानुसार मनसेच्या सहाही नगरसेवकांचा महापालिकेत प्रवेश केला. त्या सहाही नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित लावल्यानंतर शिवसेनेने आपली सदस्य संख्या वाढल्याने शक्ती प्रदर्शन करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेनेचे सर्व सदस्य भगवे फेटे बांधून सभागृहात उपस्थित होते.




या ६ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश 

मनसेचे गटनेते दिलीप लांडे, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेगावकर, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर या सहाही नगरसेवकांनी मनसेला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेच्या हिंसक आंदोलनामुळे आपण पक्ष सोडत असल्याचा दावा करत या सहा नगरसेवकांनी पक्ष सोडला होता. शिवसेनेत विलीन होण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांना पत्र दिले. मात्र, मनसेने त्यांना गट बनवण्यास हरकत घेत त्या सर्वांना अपात्र ठरवण्याची याचिका केली होती. 


शिवसेनेचा आनंदोत्सव

शिवसेना पक्षात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्याबाबत कोकण विभागीय आयुक्त यांनी आपला निकाल देत आपले अभिप्राय महापौरांना कळवले. त्यानुसार मागील महापालिका सभागृहात हा निकाल वाचून दाखवत त्या सहाही नगरसेवकांच्या विलीनीकरणाची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली होती. या घोषणेनंतर गुरुवारी पहिले सभागृह झाले. त्यात हे सर्व नगरसेवक भगवे फेटे बांधून प्रवेश केला. यावेळी शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी या सहा नगरसेवकांसोबतच सभागृहात प्रवेश केला. यावेळी 'आवाज कुणाचा', शिवसेनेचा!, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो' अशा घोषणा देत यासर्वांनी सभागृहात प्रवेश केला. यावेळी सभागृहात शिवसेनेच्यावतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.  

मनसेत प्रवेश केल्यानंतर हे सर्व सहाही नगरसेवक महापालिका सभागृह, तसेच समितीच्या कारभारात भाग घेत नव्हते. त्यामुळे चार ते पाच महिन्यांपासून महापालिकेत येत नव्हते. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा